Welcome to finance Financial Services.

धोके टाळण्यासाठी धमन्यांचा वापर करून बायपास शस्त्रक्रिया

10 Jun

धोके टाळण्यासाठी धमन्यांचा वापर करून बायपास शस्त्रक्रिया

हृदयाला रक्ताचा पुरवठा करणा-या वाहिन्यांच्या आजारावरील उपचारात कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजेच सीएबीजी पद्धत आजकाल सर्रास वापरात आहे. सन 1960 मध्ये पायाच्या रक्तवाहिनीतून सीएबीजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या तंत्रामध्ये प्रगती होऊन सन 1990 च्या दशकात इंटर्नल मेमरी ऑर्टरीचा वापर सुरू झाला.हृदयाला रक्ताचा पुरवठा करणा-या वाहिन्यांच्या आजारावरील उपचारात कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजेच सीएबीजी पद्धत आजकाल सर्रास वापरात आहे. सन 1960 मध्ये पायाच्या रक्तवाहिनीतून सीएबीजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या तंत्रामध्ये प्रगती होऊन सन 1990 च्या दशकात इंटर्नल मेमरी ऑर्टरीचा वापर सुरू झाला. आज शस्त्रक्रियेचे तंत्र बदलले आहे आणि या आजाराबद्दल अधिक जाणून घेता येऊ लागले आहे.

कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजे काय?

हृदयाला दोन वाहिन्या रक्तपुरवठा करतात. डावी मुख्य आणि उजवी हृदय रोहिणी त्यापैकी डाव्या रोहिणीचे दोन भाग होतात. त्यामुळे तीन वाहिन्यांकडून हृदयाला रक्तपुरवठा होतो. वाढत्या वयामुळे विशेषत: मधुमेही उच्च रक्तदाब व तंबाखू चघळणारे, धूम्रपान करणारे लोक आणि अ वर्गातील लोक यांच्या हृदयातील या रोहिण्यांमध्ये कोलेस्टेरॉल साठते. सीएबीजीमध्ये शस्त्रक्रिया करून हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्याचा पर्यायी मार्ग तयार केला जातो. त्यात रुग्णाच्याच शरीरातील वाहिन्यांचा वापर करून अडथळा बाजूला (बायपास) ठेवला जातो.

कॉरोनरी ऑर्टरी बायपास ग्राफ्टिंग करण्याचे तंत्र

1) ऑन पंप- हृदयाचे काम बंद करून कार्डिओ पल्मनरी बायपास मशीन (सीपीबी) चा वापर.
2) ऑफ पंप- बीटिंग हार्ट सर्जरी म्हणजेच हृदय धडधडत असताना शस्त्रक्रिया.
3) ऑन पंप बीटिंग हार्ट सर्जरी- हृदय बंद न ठेवता सीपीबी यंत्राचा वापर सीएबीजी करताना वाहिनीचा वापर.
4) पायातील सॅफेनस व्हेनचा वापर
ऑर्टरियल ग्राफ्टसमध्ये आयएमए आणि रेडियल ऑर्टरीचा वापर नेहमीच केला जातो.

महत्त्वाचा फायदा, साधनांचा पर्याय :-

पारंपरिक पद्धतीने सीएबीजी शस्त्रक्रिया करताना मेमरी ऑर्टरी आणि पायातील दोन नसांचा वापर करण्यात येतो. अर्थात आजच्या सर्जिकल रिव्हॅस्क्युलायझेशनच्या जगात धमनीचा म्हणजेच ऑर्टरीचा पर्याय म्हणून वापर करण्यास प्राधान्य दिले जाते. याचे कारण म्हणजे, दीर्घकालीन विचार करता रक्तवाहिन्यांपेक्षा धमन्यांतील टिकाऊपणा अधिक असतो आणि दुसरे म्हणजे ऑर्टिक वापरण्याने हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता बळावते. अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, बायपाससाठी ज्यावेळी नसांचा किंवा रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो तेव्हा त्यातील 50 टक्के नसांमध्ये 10 वर्षांत पुन्हा अडथळा तयार होतो. तर दहा वर्षांच्या कालावधित आयएमएचा वापर 92 टक्के उपयुक्त ठरतो आणि रेडियल ऑर्टरीचा 88 टक्के उपयुक्त ठरतो.

ऑर्टरीअल साधनांच्या अधिक उपयुक्ततेची कारणे –

1) पायातील नसा म्हणजेच रक्तवाहिन्या पायातून वरील बाजूला रक्त वाहून आणतात तो दाब अतिशय कमी असतो. तर ऑर्टरी म्हणजेच धमन्या जे रक्त वाहून नेतात त्याचा दाब जास्त असतो. जेव्हा रक्तवाहिनी किंवा नस हृदयातील अडथळा दूर करण्यास पर्यायी म्हणून वापरली जाते तेव्हा तिच्यावर जादा रक्तदाब येतो. यातून हायपरप्लासिआ ऑफ इंटिमा तयार होतो. त्यामुळे नसेत पुन्हा अडथळा तयार होण्यास सुरुवात होते.
2) या उलट धमन्यांचा वापर करून केलेल्या शस्त्रक्रियेत आर्थ्रोस्क्लेरोसीस आढळत नाही. याचा अर्थ असा नाही की ऑर्टरीअल साधने अपयशी ठरतच नाहीत. शस्त्रक्रियेच्या तंत्रातील चुका, छोट्या रक्तवाहिन्यांचा वापर अत्यंत गंभीर स्वरूपाचा हृदयविकार, डाव्या मुख्य वाहिनीचे स्वरूप सदोष असणे आणि शस्त्रक्रियेच्या वेळी नवाच आजार अचानक उद्भवणे असे याही बाबतीत घडू शकते.
3) मेमरी ऑर्टरी या लवचिक असतात त्यामुळे त्यांचा वापर करून केलेल्या शस्त्रक्रियेत आर्थ्रोस्क्लेरोसीस होण्याची शक्यता खूप कमी असते. जवळजवळ ती नसतेच.

नो टच ऑर्टिक अप्रोच म्हणजे काय?

पारंपरिक सीएबीजीमध्ये नव्याने लावण्यात येणा-या ऑर्टरीचे एक टोक आजारी धमनीला लावण्यात येते आणि वरचे टोक महारोहिणीला. हृदयातील अन्य ऑर्टरीप्रमाणेच महारोहिणीमध्ये देखील कोलेस्टेरॉलप्रभावीत द्रव येत असतो. त्यामुळे या शस्त्रक्रियेच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. इंग्रजी वाय आकाराची ऑर्टरी बसविण्याच्या तंत्रज्ञानातून हा धोका टाळता येऊ शकतो. या तंत्रज्ञानानुसार उजवी मेमरी ऑर्टरी डाव्या मेमरी ऑर्टरीला जोडण्यात येते किंवा रेडियल ऑर्टरी डाव्या आएमएला जोडण्यात येते व तीन किंवा त्यापेक्षा अधिक नसा बायपास करण्यात येतात. या तंत्रात सहा धमनींना बायपास करता येते. या शस्त्रक्रियेत तंत्राचा फार वापर करावा लागतो. त्यासाठी शस्त्रक्रियेची अत्युच्च क्षमता व कौशल्य लागते. कारण, संपूर्ण हृदयाचा रक्तपुरवठा एका धमनीवर अवलंबून राहतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सगळेच शल्यविशारद करतात असे नाही.

ऑर्टरियल नस कोणत्या रुग्णास जोडता येते?

1) जवळपास सर्वच रुग्णांना ऑर्टरिअल नस जोडता येऊ शकते, पण त्याला काही मर्यादा आहेत.
2) ज्यांच्या हृदयाचे कार्यच मंदावले आहे अशा रुग्णांच्या बाबतीत डॉक्टर्स रक्तवाहिन्यांचा वापर करतात.
3) सर्व तरुण रुग्णांना ऑर्टरीअल नसा जोडण्यात काही अडचण नसते.
माध्यम : divyamarathi